New Coach added to Latur Mumbai Express

लातूर, उदगीर, धाराशिव परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती की लातूर – मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – लातूर सुपरफास्ट एक्स्प्रेस व मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – बिदर सुपरफास्ट एक्स्प्रेस या दोन्ही सुपरफास्ट रेल्वेसाठी वातानुकूलित थ्री टियर व टू टियर मध्ये डब्यांची वाढ करण्यात यावी. नागरिकांची हि दीर्घकाळ प्रलंबित मागणी अखेरीस पुर्ण..!

22108/22107 लातूर – मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – लातूर सुपरफास्ट एक्सप्रेस
मुंबईहून: 01 डिसेंबर 2024 पासून
लातूरहून: 02 डिसेंबर 2024 पासून

दोन वातानुकूलित थ्री टियर व एक वातानुकूलित टू टियर डब्यांची वाढ करण्यात आली आहे !

22144/22143 बिदर – मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – बिदर सुपरफास्ट एक्सप्रेस
मुंबईहून: 04 डिसेंबर 2024 पासून
बिदरहून: 05 डिसेंबर 2024 पासून


दोन वातानुकूलित थ्री टियर व एक वातानुकूलित टू टियर डब्यांची वाढ करण्यात आली आहे !

नवीन डब्यांची संरचना खालीलप्रमाणे असेल :
1️⃣ प्रथम श्रेणी वातानुकूलित (फर्स्ट क्लास)
2️⃣ वातानुकूलित टू टियर
3️⃣ वातानुकूलित थ्री टियर
8️⃣ स्लीपर
4️⃣ जनरल
2️⃣ एसएलआर
➡️ एकूण: 21 ICF डबे…!

Post Ad to sell your Old Car or bike in Latur

Buyers from latur, sellers from latur. Visit website linked below.

www.Mh24.com

Scroll to Top